Dr. Ganpatrav Dekhmukh College Sangola
सांगोला/ प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील आवक-जावक विभागाच्या बोगस कामकाजाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनावर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे. कार्यालयीन पत्रव्यवहार स्वीकारताना स्वतःचे मनाने चुकीच्या गोष्टी निर्माण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले, स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाविद्यालयाची स्थापना केली होती. मात्र, त्यांच्या विचारांशी विसंगत पद्धतीने संस्थेचा कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की, संस्थेची संपूर्ण कार्यकारिणी अस्तित्वात असतानाही काही महत्त्वाचे निर्णय एकतर्फी घेतले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला. संस्थेचा कारभार पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर, प्रभारी प्राचार्य शंकर धसाडे यांच्या बोगस कामकाजावर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. याच्या शिक्षण बोगस आहे किवा कसे असा सवाल करण्यात आला आहे. महाविद्यालयात आवक-जावक विभाग असतानाही पत्रव्यवहार स्वीकारण्याबाबत स्वतःचे मनाप्रमाणे चुकीचे निकष लावून पोस्टाने पत्र पाठवण्याचे अनोखे सल्ले दिले जात आहेत. बोगस कार्यालयीन कामकाजात निश्चित नियमांचे पालन व्हावे आणि पत्रव्यवहार स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणीही करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्यांनी असा इशाराही दिला की, महाविद्यालयातील कथित मनमानी कारभार तातडीने थांबवून प्रशासनाने याची चौकशी करावी. अन्यथा याप्रकरणी पुढील कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत महाविद्यालय अध्यक्ष यांना संपर्क केला असता त्याचा संपर्क होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच प्रशासन अथवा संबंधित प्रभारी प्राचार्य अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यांची बाजू प्रसिद्ध करण्यात येईल.
