विशेष प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत असून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे संस्थेचे प्राचार्य यांना मुंबई हायकोर्ट सर्किट बँच कोल्हापूर यांच्याकडून अजमीपत्र अटक वॉरंट निघाला होता. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे संस्थेमध्ये एकच खळबळ माजली होती अशा या सचिव विठ्ठलराव शिंदे यांच्या कपटीपणामुळे लोकांच्या नुकसान करण्याच्या प्रवृत्तीमुळे उच्च न्यायालय मुंबई सर्किट बँच कोल्हापूर यांनी मोठा फटका दिला होता.
संस्थेतील कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख हनुमंत धर्मराज कोळवले यांनी इन पब्लिक न्यूज ला संपर्क केला होता यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की शाळेतील सर्व घटनेची माहिती आपण प्रसिद्ध करावी अशी आपणास विनंती करतो. याबाबत त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई सर्किट बँच कोल्हापूर यांचा आदेश देखील पुराव्यासाठी इन पब्लिक न्यूजला पाठवला आहे. तसेच संस्थेतील विविध घडामोडी जनतेसमोर मांडाव्यात, अशी विनंती त्यांनी केली. हनुमंत कोळवले यांच्या या भूमिके नंतर मात्र त्यांच्यावर संस्थेतून अनेक सवाल उपस्थित करण्यात आल्याचे बोलले जात आहे ? संस्थेचे अध्यक्ष याचे समोर आणि याचे पाठीमागे अश्या २ वेगळ्या भूमिका याचे असल्याने नक्की याची कोणती भूमिका खरी आहे असा सवाल करण्यात आला आहे ?
दरम्यान, सांगोला पोलीस ठाणे येथे याबाबत कारवाई करता आले नंतर हे दोघे काही काळ फरार होते पोलिसांनी यांच्या शोध घेतला असताना दोघे फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली यानंतर यांना पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती दिली यानंतर मात्र हे दोघे तात्काळ माननीय उच्च न्यायालय सर्किट बँच कोल्हापूर येथे हजर झाले.
संस्थेच्या इतिहासात पहिलं तर अशी घटना घडल्यामुळे या दोघांमुळे संस्थेची प्रतिमा मलीन झाल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप करत सांगितले की अशा या सचिवाला तात्काळ अध्यक्षांनी बडतर्फ करावे अन्यथा संस्थेत आंदोलन केले जाईल आबासाहेबांच्या विचाराला धक्का लावणाऱ्या लोकांची गरज या संस्थेत नाही संस्थेचे अब्रू चव्हाट्यावर आणणाऱ्या अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे असे सामाजिक कार्यकर्त्यांनी इन पब्लिकशी बोलताना सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष उच्चशिक्षित असून अशाप्रकारे गप्प का आहेत असा सवाल करण्यात आला आहे अशा या सचिवाला या संस्थेमध्ये अजून पर्यंत का ठेवले आहे का त्यांची हकालपट्टी होत नाही अध्यक्ष मात्र झोपेचे सोंग येतात का स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांना धक्का लागत असताना अध्यक्ष नेमकं करतात काय संस्थेतील अशा लोकांना अध्यक्षांनी आजपर्यंत का ठेवले आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी अध्यक्षांना केला आहे
दरम्यान, संस्थेच्या अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. “अध्यक्ष इतक्या गंभीर प्रकरणावर मौन का बाळगत आहेत? संबंधित सचिवावर अद्याप कारवाई का झाली नाही?” असे सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
आता सर्वांचे लक्ष संस्थेच्या अध्यक्षांच्या भूमिकेकडे लागले असून, या प्रकरणात अधिकृत भूमिका आणि पुढील कारवाई काय होते, याकडे इन पब्लिक न्यूजचे लक्ष राहणार आहे.
