सांगोला : सांगोला तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सहाय्यक निबंधक यांनी कारवाई करत थेट सहा संचालकांना पदावरून हटवले या कारवाईनंतर सहकार क्षेत्रात कडक कारवाईनंतर जरब बसल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अजनाळे विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित अजनाळे तालुका सांगोला या संस्थेचे व्हाईस चेअरमन समाधान जाधव व इतर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता या तक्रारीनंतर सहकार अधिकारी श्रेणी एक पंढरपूर यांची नियुक्ती करण्यात आली होती यांच्या चौकशी अहवालानंतर थेट सहा संचालकांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
सांगोला तालुक्यातील अजनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, अजनाळे येथील कारभारात अनियमितता आढळून आल्याने संस्थेच्या सहा संचालकांना पदावरून हटविण्याचे आदेश सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला डॉ. वैशाली साळवे यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेचे व्हाईस चेअरमन समाधान काशिनाथ जाधव यांनी संस्थेतील कामकाजाबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची सविस्तर चौकशी करून अहवाल सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर केला.
चौकशीत काय आढळले?
चौकशी अहवालात संस्थेच्या कामकाजात अनेक अनियमितता निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे आहेत
- 31 जुलै 2024 नंतर झालेल्या सभांच्या नोटिसा सर्व संचालकांना वेळेत देण्यात आल्या नसल्याचा ठपका.
- संस्थेच्या उपविधी 9:5 नुसार आवश्यक गणपूर्ती (कोरम) न पाळता सभा घेतल्याचा आरोप.
- गणपूर्ती नसतानाही मासिक सभांचे इतिवृत्त तयार करून निर्णय नोंदविण्यात आल्याचे निरीक्षण.
- 31/12/2025, 01/03/2025, 01/04/2025, 01/05/2025,01/06/2025, या कालावधीत अनेक संचालक मासिक सभांना गैरहजर राहिल्याची नोंद.
- संस्थेच्या कर्ज व्यवहार व ठेवी संदर्भातील प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्याचे चौकशीत नमूद.
- मासिक सभेच्या कार्यवाही व प्रत्यक्ष कामकाजामध्ये विसंगती असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले.
सहा संचालक पदावरून हटविले
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 78 अ (ब) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सहाय्यक निबंधक डॉ. वैशाली साळवे यांनी पुढील सहा संचालकांना पदावरून हटविण्याचे आदेश दिले आहेत.
- हनुमंत विठ्ठल येलपले
- अशोक लक्ष्मण कोळवले
- हनुमंत धर्मराज कोळवले
- नारायण पांडुरंग गुरव
- राणी भारत येलपले
- उषा बाबू कोळवले
या आदेशामुळे संबंधित संचालकांचे संस्थेच्या व्यवस्थापन समितीवरील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रात चर्चा
अजनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवरील या कारवाईमुळे सांगोला तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संस्थेच्या कामकाजातील पारदर्शकता, सभांचे नियोजन आणि आर्थिक व्यवहार याबाबत आता अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
