सोलापूर दि.06 (जिमाका):- उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये एकूण 9 महसूल मंडळ असून यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.01 चे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान शुक्रवार दि.8 मे 2026 रोजी मजरेवाडी व सोलापूर येथे शुक्रवार दि.15 मे 2026 रोजी (महानगरपालिका ठिकाणी असेली मंडळे) होणार आहे. सर्व नागरिक/ शेतकरी/ विद्यार्थी यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध प्रकारचे महसूली दाखले, पुरवठा कार्यालयाशी संबंधीत दाखले, इतर विभागाशी संबंधीत योजना व दाखले यांची सुविधा या शिबीरात माहिती दिली जाणार आहे. तरी नागरीकांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता संबंधित विभागात करावी . असे तालुका प्रशासनाकडून जाहिर आवाहन करण्यात येते की ,सर्व नागरीक/ शेतकारी/ विद्यार्थी यांनी संबंधित विभाग व तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार, निलेश पाटील यांनी केले आहे.
