सोलापूर : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमाती (अनु. जमाती) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.
अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. इ. 1 ली साठी विद्यार्थ्यांचे वय दि. 31 डिसेंबर, 2025 पर्यंत 6 वर्षे पूर्ण असावे. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला यांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व जन्मतारीख प्रमाणपत्र (ग्रामसेवक/अंगणवाडी दाखला) जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी व पालकांच्या आधारकार्डच्या छायांकित प्रती जोडाव्यात. पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत. खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
निवड झाल्यानंतर शाळा बदलता येणार नाही. अधिक माहितीसाठी बी. के. आंदळकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (मो. नं. 8468807520) यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लाख असून सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला आवश्यक आहे.
