तामिळनाडू : 2026 विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर अभिनेता ते राजकारणी बनलेले Thalapathy Vijay पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या विजयानंतर आता 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका सिनेमातील क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हायरल क्लिपमध्ये विजयच्या गाडीवर “TN 07 CM 2026” असा नंबर दिसत असून, चाहत्यांकडून यालाच “2026 मध्ये मुख्यमंत्री होण्याची भविष्यवाणी” म्हणून जोडले जात आहे. विशेष म्हणजे, त्या काळात हा सीन फक्त सिनेमाचा भाग मानला जात होता. मात्र आता विजयच्या राजकीय यशानंतर तोच सीन पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर अनेक युजर्स “विजयने आधीच संकेत दिले होते का?” अशी चर्चा करत आहेत. काही चाहत्यांनी तर हा सीन शेअर करत “रिल ते रिअल” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, विजयच्या विजयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल झाल्याची चर्चा सुरू असून, त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता जुने सिनेमे, संवाद आणि दृश्यं पुन्हा शोधून त्यावर चर्चा रंगताना दिसत आहे.
थलपती विजय याने 2026 च्या तामिळनाडू निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर आता त्याच्या जुन्या सिनेमातील एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या क्लिपमध्ये विजयने 2026 मध्ये सीएम होणार असल्याची आधीच भविष्यवाणी केल्याचं बोलंल जातय.विजयच्या गाडीच्या नंबर प्लेटवर TN 07 CM 2026 असा नंबर पहायला मिळतय. आता राजकीय विजयामुळे तो सीन पुन्हा चर्चेत आला आहे.
