न्यूझीलंडचा दणदणीत पराभव, रोहितच्या नेतृत्वाखाली ९ महिन्यांत दुसरे ICC विजेतेपद! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 252 धावांचे लक्ष्य 49 षटकांत पूर्ण केले. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे 9 महिन्यांतील हे दुसरे ICC विजेतेपद आहे. त्याने गेल्या वर्षी 29 जून रोजी टी-20 विश्वचषकही जिंकला होता.
रोहित शर्माने कर्णधार खेळी करत 76 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना श्रेयस (48 धावा), केएल राहुल (नाबाद 34 धावा), अक्षर पटेल (29 धावा) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने सलग दोन षटकांत 2 गडी बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना माघारी पाठवले. न्यूझीलंडकडून डेरिल मिचेलने (63 धावा) सर्वाधिक धावा केल्या.
An exceptional game and an exceptional result!
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2025
Proud of our cricket team for bringing home the ICC Champions Trophy. They’ve played wonderfully through the tournament. Congratulations to our team for the splendid all around display.
When a picture speaks for itself 🇮🇳🇮🇳#TeamIndia CHAMPIONS! pic.twitter.com/cWY0CctTzu
— BCCI (@BCCI) March 9, 2025
भारत-न्यूझीलंड धावफलक
दोन्ही संघांची प्लेइंग-11
- भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
- न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि विल्यम ओरूर्क.