Veerashaiva Lingayat Samaj and Mahatma Basaveshwara
सांगोला : सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, सांगोला महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या प्रतिमेस दि. 19 एप्रिल 2026 रोजी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
समाजातील प्रत्येकाने सदाचाराने आचरण करावे, निती-नियमांचे पालन करावे, अनाचार करू नये, चोरी, राग, मत्सर यांचा त्याग करावा, इतरांचा तिरस्कार करू नये, दुस-यांची निंदा करू नये, समानतेने आचरण करा असा महान संदेश व शिकवण महात्मा बसवेश्वर यांनी दिल्याचे सांगून, ते महान व्यक्तीमत्व होते, असे मत महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सदाशिव देवकर, श्री. शंकर माने, श्री. प्रदिप आसबे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास प्रा.सुर्यकांत पाटील, प्रा. गणेश पैलवान, प्रा.सुरवसे, प्रा.चेडे, प्र.अधिक्षक श्री. विलास माने, श्री. प्रसाद शेंडे, यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
