सोलापूर : मातृत्व ही जीवनातील सर्वात संवेदनशील व महत्त्वाची अवस्था. या काळात आई व बालकाच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची व शासनाची जबाबदारी आहे. याच उद्देशाने केंद्र शासनाने जननी सुरक्षा योजना राबवली असून, ग्रामीण व शहरी भागातील हजारो महिलांना याचा थेट लाभ मिळत आहे.
योजनेचा उद्देश
– माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
– महिलांना शासकीय आरोग्य केंद्रात सुरक्षित प्रसूतीसाठी प्रोत्साहन देणे.
लाभार्थी
– अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील सर्व गर्भवती महिला या योजनेच्या कक्षेत येतात.
लाभाचे स्वरूप
– घरगुती प्रसूतीसाठी ₹५०० आर्थिक सहाय्य.
– शासकीय किंवा शासनमान्य आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यास शहरी भागात ₹६०० व ग्रामीण भागात ₹७००.
– सिझेरियन प्रसूतीसाठी थेट ₹१५०० मदत.
– सर्व रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटी व पीएफएमएसद्वारे जमा केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
– एमसीपी कार्ड व आरसीएच क्रमांक.
– लाभार्थी महिलेचे बँक पासबुक.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. आर्थिक सहाय्यामुळे कुटुंबातील भार कमी होतो व आई-बालकाच्या आरोग्याची हमी मिळते. शासनाच्या या उपक्रमामुळे मातृत्व सुरक्षिततेकडे समाजाचा वाढत असून, आरोग्य सेवांवरील विश्वासही वाढत आहे.
