विशेष प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील हणमंत कोळवले यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सांगोलाचे प्रथम नागरिक आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित प्रशासनाकडून वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल आणि नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना, “सांगोला तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कृत्याला स्थान दिले जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान असून प्रशासनाने निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मांडल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले. तसेच स्व. आबासाहेब यांनी जपलेल्या शांतताप्रिय आणि लोकाभिमुख परंपरेला धक्का पोहोचू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माध्यमांच्या कामात अडथळा आणला
हणमंत कोळवले यांनी इन पब्लिक न्यूजला संपर्क करत आमच्या संस्थेची बातमी द्या असे सांगितले होते. तसेच त्यांनी पुरावे देखील पाठवले होते. यानंतर सर्व घटनेची शहानिशा करत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर माझी बदनामी का करता म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या कामात अडथळा आणण्याचे काम त्यांनी केले. या कृत्याबाबात त्यांना कठोर शासन लवकरात लवकर करावे अशी मागणी इन पब्लिक न्यूज तालुक्याचे प्रथम नागरिक, पोलीस प्रशासनाला निवेदन देत विनंती केली आहे.
त्यानंतर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या कामात अडथळा आणण्याचे काम केल्याचा आरोप इन पब्लिक न्यूजने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
