अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्याने आणि संभाव्य संघर्ष निवळल्याने जागतिक पातळीवर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. युद्धसमाप्तीच्या शक्यतेमुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी याचे परिणाम जागतिक बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण होत असताना दुसरीकडे सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
औद्योगिक मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने चांदीच्या दरांना चांगली चालना मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव अचानक वरच्या दिशेने गेले आहेत.
सोन्याच्या दरांचा विचार केला तर सलग दुसऱ्या दिवशी त्यामध्ये वाढ झाली आहे.सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले असून, बाजारात सोनं अधिक महाग झाले आहे.
