मुंबई : राज्यभरातील नागरिक आणि शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना अद्यापही पावसाचा ठोस पत्ता लागलेला नाही. 15 जूनपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, मॉन्सूनचा प्रवास अरबी समुद्र परिसरातच मंदावल्याचे चित्र दिसत आहे.
मॉन्सूनच्या विलंबामुळे अनेक भागांतील पेरण्या रखडल्या असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. हवामानातील बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसाबाबत अनिश्चितता वाढली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती सक्रिय असल्याने पावसाच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून पुढील सूचना मिळेपर्यंत घाईघाईने पेरण्या करू नयेत, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
मॉन्सून उशिरा पोहोचत असतानाच राज्यातील तापमानात वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मॉन्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काही दिवस हवामानाच्या दृष्टीने .
