सांगोलादेश- विदेश

छ.शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार केल्याने शिवप्रेमीकडून तीव्र निषेध

महाराष्ट्रात ३ एप्रिल हा काळा दिवस म्हणून पाळला जातो


सांगोला/विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवार दि ३ एप्रिल रोजी सांगोला येथे नागरी सत्कार समारंभ पार पडला. छ. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच हा सत्कार आयोजित केल्याने सांगोला शहर आणि तालुक्यातील शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. छ. शिवरायांच्या पुतळ्यासमोरच हा कार्यक्रम घेतल्याने शिवप्रेमींनी शहरातील छ शिवाजी महाराज चौकात असलेल्या छ. शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून या नागरी सत्काराचा निषेध व्यक्त केला.

Big Breaking : निवडणुकीनंतर सांगोल्यात ऐतिहासिक क्षण: तिन्ही आमदार पहिल्यांदा एकाच मंचावर!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुखद निधन झाले होते तेंव्हापासून सबंध महाराष्ट्रात ३ एप्रिल हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. जयकुमार गोरे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी असते याचे भान नव्हते का असा संतप्त सवाल यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित केला.यावेळी शिवप्रेमी दत्तात्रय सावंत, धनाजी ढेकळे, अभिषेक कांबळे, सचिन जाधव, पांडुरंग पाटील, अशोक भालके, भारतदादा साळुंखे, प्रदीप बनसोडे, सुदर्शन जाधव, अविनाश नलवडे, संतोष नकाते, महेश नागने, डॉ निरंजन केदार, अमर शिंदे, सोनू केदार आदींसह शिवप्रेमी तरुण उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव अशा घोषणांनी छ. शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला होता यावेळी बोलताना शिवप्रेमी दत्तात्रय सावंत म्हणाले, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय? एक मंत्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला जयंती म्हणतो आता तर छत्रपती शिवरायांचा पुण्यतिथी दिवशी त्यांच्या पुतळ्या समोरच नागरी सत्काराचा नावाखाली पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी जो उन्माद साजरा केला तो नक्कीच शोभनीय नाही. तर अभिषेक कांबळे यांनीही कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे आणि या सत्कार समारंभाच्या संयोजन समितीवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button