सांगोला

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विदयार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगिकृत करावे : प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले

प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले


सांगोला/महेश लांडगे : सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.

कवी अनंत राऊत यांचेशब्दावरील प्रभुत्व,हृदयस्पर्शी काव्यमय समाजप्रबोधनामुळे श्रोते विद्यार्थी भावूक

यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगून, त्यांचा कार्याचा आदर्श विदयार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगिकृत करावा असे मत व्यक्त् केले. तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर यांनी आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असून, त्यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने करावे.       कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.अमोल पवार व श्री. राहुल ढोले, श्री. प्रदिप आसबे यांनी केले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button