पन्हाळा वन परिक्षेत्र कार्यालय वन विभागाच्या इमारतीत : उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन
वन परिक्षेत्र कार्यालय पन्हाळा तालुक्यात १९५७ साली स्थापन झाले आहे

पन्हाळा/राजू मुजावर : पन्हाळा तालुका वन परिक्षेत्र कार्यालय आता नवीन सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाले आहे. कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या हस्ते आणि सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
दिर्घकालीन प्रतीक्षेला पूर्णविराम
पन्हाळा तालुक्यात १९५७ साली स्थापन झालेले वन परिक्षेत्र कार्यालय यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतीत होते. मात्र जागेची कमतरता आणि इतर अडचणींमुळे कार्यालयाच्या स्वत:च्या इमारतीची गरज निर्माण झाली होती.
सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
३० लाख निधीतून नवीन इमारत उभारणी
पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहितेयांनी विशेष प्रयत्न करून राज्य योजनेतून ३० लाखांचा निधी मंजूर करवून घेतला. या निधीतून गायकवाड वाड्यानजीक वन विभागाच्या हद्दीतील जागेत आधुनिक सुविधा असलेली इमारत उभारण्यात आली.
उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
शुक्रवारी पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यास निवासी नायब तहसीलदार संजय वळवी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, वनपाल सागर पटकरे, वनरक्षक संदीप पाटील, तसेच पन्हाळ्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुविधायुक्त कार्यालयाने कामकाज सुलभ होणार
नवीन इमारतीमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल तसेच वनसंवर्धन आणि संरक्षणास चालना मिळेल, असा विश्वास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.