पत्नी दुसऱ्याच्या मिठीत,नवरा हे पाहून संतापला; मग असा रक्तरंजित सुरू झाला खेळ…

Uttar Pradesh : एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या साथीदाराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली. महिलेचे आणि त्याचे प्रेमसंबंध होते. पती तिला या गोष्टीसाठी विरोध करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीगडमधील चिकलोरा येथील ताजबाग कॉलनीतील रहिवासी मोहम्मद बेपत्ता झाला होता. त्यानंतर ९ एप्रिल रोजी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही तक्रार मोहम्मद चमनची पत्नी खैरून्निशा हिने दाखल केली होती. तिने सांगितले की ६ एप्रिलच्या दुपारी कोणाचा तरी फोन आला आणि चमन घरातून निघून गेले. त्यानंतर ते परत आले नाहीत. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पतीने पत्नीला दुसऱ्याच्या आक्षेपार्ह स्थितीत पाहिले
पोलिसांना मृतदेह सापडला. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. अज्ञात मानून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका महिन्यानंतर मृतदेहाची ओळख त्याच्या कपड्यांवरून झाली. चमनने आपली पत्नीला दुसऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. तेव्हापासून दोघांमध्ये तणाव होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद अलीने चौकशीत आपला मेहुणा चमनच्या घरी ये-जा करत असल्याची त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे.