कृषीदेश- विदेश
एक एकरातून मिळवा ५ लाखांचा नफा! ‘एवोकाडो शेती’ ठरणार शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर

कृषी विशेष : पारंपरिक पद्धतीच्या बाहेर पडत शेतीत नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी एवोकाडो लागवड! ‘मक्खन फळ’ म्हणून ओळखलं जाणारं हे फळ चवीलाही खास आणि आरोग्यासाठीही अमूल्य आहे.
आजच्या हेल्दी जगण्यात एवोकाडोची मागणी झपाट्याने वाढतेय. विशेष म्हणजे याला देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. कमी खर्च, योग्य हवामान, आणि योग्य नियोजन केल्यास एक एकरातुन दरवर्षी ३ ते ५ लाख रुपये सहज कमवता येऊ शकतात!
एवोकाडो लागवडीसाठी आवश्यक बाबी:
- हवामान: 15 ते 30 अंश सेल्सियस तापमान असणारे हवामान योग्य
- जमीन: खोल, निचऱ्याची चांगली सोय असलेली जमीन; pH 5 ते 7 दरम्यान असलेली आम्लधर जमीन उपयुक्त
- खर्च: तुलनेत कमी, परंतु दर्जेदार रोपांची लागवड आणि देखभाल गरजेची
एवोकाडो शेतीचे आर्थिक गणित :
- झाडामागे उत्पादन: सरासरी 100–150 किलो प्रतिवर्ष
- बाजारभाव: 150 ते 400 रुपये प्रति किलो
- नफा: एका एकरातून दरवर्षी 3 ते 5 लाखांपर्यंत उत्पन्न शक्य
- बाजारपेठ: स्थानिक मार्केट, सुपरमार्केट्स, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि हॉटेल इंडस्ट्रीत प्रचंड मागणी
शेतकऱ्यांसाठी संदेश:
जर तुम्ही शेतीत काही नवं करून पाहण्याचा विचार करत असाल, तर एवोकाडो लागवड ही एक उत्तम संधी आहे. कमी गुंतवणूक, चांगला परतावा, आणि मोठी बाजारपेठ यामुळे ही शेती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बळकट करू शकते.