
सांगोला/प्रतिनिधी : एम एच टी सी इ टी च्या निकालासाठी अग्रगण्य असलेले एकमेव कोचिंग सेंटर चौगुले सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर (पंढरपूर)यांचेमार्फत एम एच टी सी इ टी मॉक टेस्टचे आयोजन शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या एम एच टी सी इ टी या परीक्षेच्या धर्तीवर आयोजित केलेल्या या टेस्टला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली तसेच सदर उपक्रमासाठी स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूरचे प्रा. करण पाटील सर प्रा. अनुसे सर यांनी चौगुले सायन्स क्लासेसचे संचालक प्रा. संजय चौगुले सर व त्यांच्या सर्व शिक्षकांचे शाल व विठ्ठलाची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर प्रा. करण पाटील सर यांनी चौगुले सायन्स क्लासेसच्या यशस्वी घोडदौडीबद्दल शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत सर्वाधिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी गव्हर्मेंट तसेच ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये पाठवणाऱ्या चौगुले सायन्स क्लासेसच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालक यांचेकडून समाधान व्यक्त करण्यात आले.