सांगोल्याचा ढाण्या वाघ पुन्हा होणार आमदार, शिष्टमंडळाची मंत्रीमंडळासोबत सकारात्मक चर्चा
सांगोलामध्ये लवकरच पुन्हा गुलाल उधळण्यात येईल ?

मुंबई/सहदेव खांडेकर : मा.आमदार शहाजी बापू पाटील यांना पुन्हा आमदार करावे अशी मागणी सांगोला तालुक्यातून पुन्हा जोर धरत आहे. बापूंनी गेल्या पंचवार्षिकमध्ये कोट्यावधींचा निधी आणून शहरातील तसेच तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाड्या वस्तीवरील अनेक विकासाची कामे केली आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये बापूंचा अल्पमताने पराभव झाला, परंतु बापूंनी अनेक विकासाची कामे पराभव झाल्यानंतर देखील तितक्याच जोमाने सुरू ठेवली आहेत.
तालुक्यातील जनतेने बापू पुन्हा आमदार होण्याचे मागणी थेट मुंबई येथे केली आहे. यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बापूंच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
अर्रर्र..”हे” तर रोजच आहे, विद्यार्थी म्हणतात…,न्यू इंग्लिश स्कूल,ज्यू.कॉलेज येथील शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी
दरम्यान, सांगोलामध्ये लवकरच पुन्हा गुलाल उधळण्यात येईल? बापूंना पुन्हा आमदारकी देऊन सांगोल्याच्या विकासामध्ये पुन्हा गती देण्याचे काम होईल. विद्यमान सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी हा सांगोल्यासाठी मिळेल अशी माहिती शिष्टमंडळाने दिली आहे.