मोबाईलमधील इन्स्टाग्राम फोटोवरून वाद झाल्याचा तक्रारीत उल्लेख; डीवायएसपींकडे तपासाची जबाबदारी
सांगोला | इन पब्लिक न्यूज :
सांगोला तालुक्यातील हंगिरगे परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाने सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरोधात कायदेशीर करण्यात आली आहे.
मोबाईलमधील इन्स्टाग्राम चॅटवरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात
आला आहे. फिर्यादीने इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटमधील चॅट आणि काही छायाचित्रे यावरून वादाचे रुपांतर भांडणात झाले यानंतर संबंधित माहिती मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
मारहाण केल्याचा आरोप
तक्रारीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र सांगोल्याहून नवीन गाडी घेऊन जात असताना मध्येच त्यांना अडवण्यात आले. ७ व्यक्तींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी तसेच हाताने मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेत फिर्यादीचे डोके फुटले,हाताला पाठीला जोरदार मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मित्रांना दुखापत झाल्यानंतर त्यांनी उपचार घेतले आणि पुढे सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली.
डीवायएसपींकडे तपासाची जबाबदारी
या प्रकरणी फिर्यादीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमधील कारवाईच्या नोंदीनुसार, तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी (Dy.SP) यांच्याकडे आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून संबंधित सर्व बाजूंची चौकशी होणे अपेक्षित असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
