विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य पदाच्या नियमित नियुक्तीचा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या पदासाठी लाखोंची नव्हे तर कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार असल्याची चर्चा सुरू असून, या चर्चेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
महाविद्यालयातील प्राचार्य पद सध्या प्रभारी स्वरूपात असून, या पदाला नियमित मान्यता देऊन नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. नियमानुसार विद्यापीठाची समिती तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रक्रियेतून ही नियुक्ती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने या पदासाठी संस्था अध्यक्ष व संस्था सचिव यांच्याकडून लाखोंचा आकडा कोट्यावधी रुपया म्हणून पोहोचला असल्याचे बोलले जात आहे. तसेच मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी लाखोंमध्ये चर्चेत असलेला कथित ‘रेट’ अचानक कोट्यवधींपर्यंत पोहोचल्याची चर्चा असल्याचा दावा केला जात आहे. महाविद्यालयीन वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, प्राचार्य पदासाठी खुल्या मुलाखती आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मुलाखतीची प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार आहे का? विद्यापीठ निवड समिती तसेच शिक्षण सहसंचालक यांच्याकडून या निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आणि पात्रतेच्या आधारावर होणार आहे का? की आधीच उमेदवार निश्चित करून केवळ प्रक्रियेचा देखावा केला जाणार आहे? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी सलगी आहे मी शिक्षण विभाग कमिटी यांना पैशाच्या जीवावर मला हे पद पाहिजेच आणि पैसे दिले की हे पद मिळतेच असा छाती ठोक दावा केल्याचे महाविद्यालयाच्या परिसरातून बोलले जात आहे तसेच काही कमिटीचे वरिष्ठ लोकांशी जवळीक असल्याचे सांगणारे दावे, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याची भाषा केल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. ‘पैशाच्या जोरावर कामे करून घेता येतात’ अशा स्वरूपाच्या चर्चांमुळे नियुक्ती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र अशा दाव्यांची सत्यता अधिकृत तपासणीअंतीच स्पष्ट होऊ शकते.
प्राचार्य पदाची नियुक्ती ही केवळ एका व्यक्तीच्या पदाचा प्रश्न नसून संपूर्ण महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रशासनाशी संबंधित बाब आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत कोणते निकष वापरले जाणार, उमेदवारांची पात्रता काय आहे, मुलाखत समितीमध्ये कोणाचा समावेश आहे आणि अंतिम निर्णय कोणत्या पातळीवर घेतला जाणार, याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात नेमके सत्य काय आहे, प्राचार्य पदासाठी कोणकोणते उमेदवार चर्चेत आहेत, निवड प्रक्रिया कोणत्या नियमांनुसार होणार आहे आणि कोट्यावधीच्या आर्थिक व्यवहाराच्या चर्चांमध्ये तथ्य आहे का, याबाबत इन पब्लिक न्यूजकडून याबाबत महाविद्यालयातील प्रशासन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल व तशी माहिती प्रसारित केली जाईल तसेच महाविद्यालयात अनेक वेळा प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासन नेहमीच पळ काढण्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहे.
https://www.instagram.com/reel/Dcc2L3PiCkH/?igsi=cGdnMjJpdmw2N3kz