शैक्षणिकमहाराष्ट्र

स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यास १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत


सोलापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे असून अर्ज भरण्याकरिता दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. सदर योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आदी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांचेकडून स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये यासाठी पोर्टल वर अर्ज भरण्यासाठी दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!

तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत व यापूवी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवरती लॉग इन करून आपला बँक तपशिल भरावा असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button