Economyदेश- विदेशमहाराष्ट्र

पीएम किसान ॲप्लीकेशनपासून सावध रहा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले

पी.एम.किसान "एपीके" लिंक उघडताच शेतकऱ्यांची बँक खाती होताहेत रिकामी?


सोलापूर/राहुल कोळेकर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी.एम.किसान यादी किंवा पी.एम.किसान ॲप या मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशनपासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

सोलापूर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न

शेतकऱ्यांनी मोबाईलवर पी.एम.किसान लिस्ट, ॲप किंवा पी.एम.किसान ॲप या संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच, अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले यांनी केले आहे.

अशी घ्यावी शेतकऱ्यांनी काळजी :

  • शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
  • पी.एम.किसान योजनेच्या नावाने येणाऱ्या फसव्या ॲप्सपासून सावध राहावे.
  • बँकेची माहिती कोणालाही देऊ नये.
  • कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button