क्रीडादेश- विदेश

थायलंड आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सांगोल्याने मारली बाजी 

वाघमारे सर हे गेली सत्तावीस वर्ष सांगोल्यातील मुला मुलींना प्रशिक्षण देत आहेत


सांगोला/स्वप्नील सासणे : रत्ना बुडीट  युनिव्हर्सिटी  स्पोर्ट्स हॉल येथे थायलंड कराटे कप 2025 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकूण 32 भारतीयांचा समावेश होता त्यापैकी सांगोल्यातून तीन व्यक्तींचा समावेश होता या स्पर्धेमध्ये सांगोल्याला मिळाली.सीनियर गटामध्ये जी के वाघमारे सरांनी कता प्रकारात मिळविले सुवर्णपदक अठरा वर्षाच्या आतील गटामध्ये निजेंद्र चौधरीला मिळाले. सुवर्णपदक व वीस वर्षाच्या आतील गटात  आशिष कोकरेला कता व कुमितेमध्ये दोन ब्रांझ पदके मिळाले. बेस्ट रेफ्रीचा सन्मान   निजेंद्र चौधरी व वाघमारे सरांना मिळाला उत्कृष्ट  प्रशिक्षकांचा सन्मान वाघमारे सरांना मिळाला.

वाघमारे सर हे गेली सत्तावीस वर्ष सांगोल्यातील मुला मुलींना प्रशिक्षण देत आहेत. वाघमारे सरांचे वडील किसन वाघमारे हे मूळची सांगोल्याचे असून ते लोको पायलट ए ग्रेडपदावर  काम करत होते. वाघमारे सर हे न्युइंग्लिश स्कूल येथील मागील पटांगणावररोज सायंकाळी सहा ते सात या वेळात सांगोल्यातील मुला मुलींना कराटेचे प्रशिक्षण देत आहेत आणि सह्याद्री इंग्लिश मीडियम मध्ये व विद्यामंदिर इंग्लिश मीडियम येथे मुलांना कराटेचे मार्गदर्शन देत आहेत.

निजेन्द्र चौधरी चे वडील रतनलाल चौधरी हे सांगोल्यातील प्रसिद्ध स्वीट व्यापारी आहेत आशिष कोकरे यांचे वडील बाळासाहेब कोकरे हे सैन्यात कार्यरत आहेत. वाघमारे सर निजेंद्र चौधरी यांनी गेल्या वर्षी थायलंड येथे उत्कृष्ट कामगिरी केली होती. यावर्षी त्यांनी उत्तुंग यश संपादन केले या यशाबद्दल सांगोला येथील कराटे क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.  यशस्वी स्पर्धकांना मा.चेतनसिंह केदार-सावंत, राजू मगर, राजू ढोले, प्रतापसिंह (आबा )इंगोले ,अनिता इंगवले, प्रमोदिनी जाधव, डॉ. स्वीट स्मिता गव्हाणे, उत्तम ढोले,डॉ.शैलेश डोंबे, साहिल सय्यद, प्रो .जयंत लाडे, किरण चव्हाण, सह्याद्री इंग्लिश मीडियम परिवार, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम परिवार, शिवाजीनगर मित्रपरिवार  शिवप्रेमी मित्र मंडळ, संदीप चौगुले मित्रपरिवार, सर्वच राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button