सोलापूर दि. 6 (जिमाका): : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील दुसरे महायुद्ध लाभार्थ्यांनी शासनाच्या प्रचलित नियमानुसार माहे मे २०२६ अखेरपर्यंत आपले हयातीचे दाखले जमा करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत जमा करावीत.
ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले ३१ मे २०२६ पर्यंत कार्यालयास प्राप्त होणार नाहीत, त्यांचे अनुदान माहे मे २०२६ पासून बंद करण्यात येणार असून, हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतर फरकासह अनुदान अदा करण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तसेच ज्या लाभार्थ्यांचे निधन झाले आहे, अशा लाभार्थ्यांच्या अवलंबितांनी मृत्यूचा दाखला अर्जासह लवकरात लवकर कार्यालयात जमा करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
