उमेद अभियान : ग्रामीण भागातील गरीबी निर्मूलनासाठी केंद्र शासनाने दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले. महाराष्ट्रात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्थापन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात हे अभियान इंटेन्सिव्ह पद्धतीने राबविले जात असून, राज्यस्तरापासून ग्रामस्तरापर्यंत स्वतंत्र, संवेदनशील व समर्पित यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
महिलांच्या संघटनाची ताकद
– जिल्ह्यात आतापर्यंत २५,७३५ महिला बचत गट स्थापन झाले असून २,५२,१३० महिलांचे संघटन झाले आहे.
– १३४९ ग्रामसंघ व ६९ प्रभागसंघ कार्यरत आहेत.
– या संघटनांमुळे महिलांमध्ये आर्थिक शिस्त, सामाजिक नेतृत्व व आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
आर्थिक सहाय्य व निधी वितरण
– २३,०१८ पात्र समूहांना अभियानामार्फत ₹३४५२ लाख फिरता निधी वितरीत.
– १४,७३४ समूहांना ₹८८४० लाख समुदाय गुंतवणूक निधी दिला.
– मागील पाच वर्षांत बँक कर्ज वितरणात राज्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप करून सोलापूरने राज्यात अव्वल क्रमांक मिळविला.
– कर्जाची परतफेड १००% झाली असून महिला बचत गटांचे अभिनंदन.
– स्टार्टअप निधी ₹१५८० लाख ग्रामसंघ व प्रभागसंघांना वितरीत.
– ४५० उत्पादक संघ स्थापन, ₹६२९ लाख निधी महिलांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी.
आदर्श प्रभागसंघ व प्रशिक्षण
– जिल्ह्यातील २५ प्रभागसंघ आदर्श प्रभाग म्हणून निवडले गेले.
– प्रत्येक प्रभागसंघास ₹२.५० लाख पायाभूत सुविधा व ₹१५ लाख आर्थिक तूट भरपाई अनुदान केंद्र शासनाकडून.
– महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, बँक सखी व BC सखी मार्फत बँकिंग सेवा गावापर्यंत.
– डिजिटल साक्षरता प्रशिक्षण सक्षम केंद्रांमार्फत.
कौशल्य व रोजगार निर्मिती
– RSETI मार्फत १८–४५ वयोगटातील युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण.
– महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP), सेंद्रिय शेती उपक्रम, फार्मर प्रोड्यूसर कंपनी – १५ महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन.
– पंढरपूर, करमाळा, माढा, सांगोला तालुक्यातील शेवगा, केळी, पेरू, डाळिंब आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवून सोलापूरचे नाव देशभरात उंचावले.
*SMART प्रकल्प व लखपती दीदी योजना
– मा. बाळासाहेब ठाकरे SMART प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील १२ कंपन्यांचे प्रस्ताव, त्यापैकी ९ मंजूर.
– लखपती दीदी योजना – चालू आर्थिक वर्षात १,००,३१६ महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण.
*उद्योजकता व वाहतूक सुविधा
– SVEP – मोहोळ व बार्शी तालुक्यात बिगर शेतीवर आधारित व्यवसाय.
– AGEY योजना – बार्शी तालुक्यात ६ गाड्या ग्रामसंघांना वितरीत.
*विपणन उपक्रम व उमेद मार्ट
– रुविमणी मिनी शॉपिंग मॉल, नारीशक्ती प्रभाग संघ, मंगळवेढे मिलेट्स प्रक्रिया उपक्रम.
– पंढरपूर तालुक्यात द्राक्ष प्रक्रिया करून बेदाणे उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज सुविधा.
– जिल्हा नियोजन विभागाकडून निधी.
– उमेद मार्ट – Online Ecommerce Platform सुरू, जिल्ह्यातील उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध.
या अभियानामुळे सोलापूर जिल्ह्यातील महिलांनी आर्थिक स्वावलंबन, सामाजिक नेतृत्व व उद्योजकतेत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बचत गटांमुळे ग्रामीण भागात गरीबी निर्मूलन, रोजगार निर्मिती व शाश्वत विकासाची दिशा मिळाली आहे.
