रोहित हेगडे : सांगोला शहरात वकील सागर मेटकरी यांनी पोलिसांनी वकील आहे असे सांगीतलेनंतर मला मारहाण केल्याची सांगितले होते. दरम्यान वरिष्ठ वकील आणि मेटकरी हे माध्यमांशी बोलताना त्यांनी झालेल्या घटनेची माहिती वेगवेगळी दिली. त्यांना यावर माध्यमांनी विचारले असता उत्तरे सुद्धा तसेच दिले. यानंतर मात्र वकील संघटनेच्या अडचणीत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक नेत्यांचा दावा : “मोठा अनर्थ टळला” तर आजी-माजी आमदार तोडगा काढणार काय?
दरम्यान, पोलीस प्रशासनाने ५५ वर्षाच्या इतिहातील एक मोठा अनर्थ तत्परतेमुळे टाळला असल्याचे सामाजिक नेत्यांकडून बोलले जात आहे. यावर आजी-माजी आमदार या घटनेवर त्यांच्याकडून तोडगा काढला जाईल का? असा सवाल जनतेने केल आहे? कारण कायदा आणि प्रशासन आमने सामने आले आहेत.
वाद अधिक चिघळण्याची चिन्हे?
तर आता हा वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. वकील सघटनेने रिट दाखल करण्यात येईल असा इशारा दिला. परंतु संघटनेच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलिस पुरावे देऊन नेमका काय स्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
