रोहित हेगडे : सांगोल्यात सध्या वकील संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असून वातावरण तापले आहे. वकील संघटनेने पोलीस निरीक्षकांविरोधात थेट पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर In Public News कडून पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी सर्व बाबींचा तपशीलवार खुलासा लवकरच माध्यमांसमोर आणि वकील संघटनेसमोर पुराव्यानिशी मांडला जाईल, असे सांगत वेळ मागितला. त्यामुळे आता पोलीस प्रशासन नेमका कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अन्यायग्रस्त असल्याचे सांगितले जाणारे सागर मेटकरी, संघटनेचे अध्यक्ष विशालदीप बाबर आणि त्यांच्या वरिष्ठ वकिलानी काय भूमिका मांडली?
👉 पाहा संपूर्ण व्हिडिओ
दरम्यान, वकील संघटनेतही बैठकींचे सत्र सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अधिकृत भूमिकेसाठी संघटनेच्या नव्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले.
या प्रकरणात सागर मेटकरी यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सागर मेटकरी, संघटनेचे अध्यक्ष विशालदीप बाबर आणि वरिष्ठ वकील यांनी वेगवेगळी विधाने केल्याने मोठा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे नेमके सत्य काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
