रोहित हेगडे : वकील संघटनेने adv मेटकरी यांना पोलीस निरीक्षकाने वकील आहे असे सांगितले असताना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याबाबत निवेदन पोलीस ठाण्यात दिले आहे. आरोपांवर वकील संघटनेचे अध्यक्ष व सिनिअर वकिलांनी माध्यमांसमोर भूमिका मांडत असताना तफावत आहे की काय? असा जनतेने सवाल केला?
पो.नी.विनोद घुगे यांच्याशी इन पब्लिक न्यूजने प्राथमिक चर्चा केली असता, त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली असता ते म्हणाले, संपूर्ण घटनेचा तपास सुरु आहे. लवकरच मोठा गौप्यस्फोट होईल व कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व तपास केला जाईल असे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पोलीस प्रशासन पारदर्शकपणे कार्य करत असून नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अबाधित ठेवणे हीच आमची भूमिका राहील आम्ही जनतेचे सेवक आहे असे ते म्हणाले.
