सांगोला : सांगोला तालुक्याच्या राजकारणात एका फोटोची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. डॉ. पियूष पाटील यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या या फोटोमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन देत लिहिले “ही १ गळा भेट ६५ वर्षांची सत्ता घेऊन गेली!!” असा मजकूरही लिहिण्यात आला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सांगोला तालुक्यातील राजकीय घडामोडींशी हा फोटो जोडला जात असल्याने स्थानिक स्तरावर त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटो किंवा संदेश व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध अर्थ काढले जातात. त्यामुळे या फोटोमागील वास्तविक पार्श्वभूमी काय आहे, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
सध्या तरी हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरणात त्याने चांगलीच खळबळ उडवली आहे. पुढील काळात यावर संबंधितांकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

