विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील KG to PG शिक्षण देणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज व डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या कारभाराचा भोंगळ चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. सहकारी संस्थेत सुरू असलेल्या गोंधळ, अनियमितता आणि कायद्याच्या सर्रास उल्लंघनावर आता थेट हकालपट्टीचा बडगा उचलला आहे.
डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयातील एका विनाअनुदानित प्राध्यापकाला थेट संचालक पदावरून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी सहाय्यक निबंधकांनी आदेश जारी करत अजनाळे विविध कार्यकारी सेवा मर्या. सहकारी संस्थेतील संचालक पदासाठी संबंधित व्यक्ती अपात्र असल्याचा ठपका ठेवला आहे.
अनियमितता, कायद्याचे उल्लंघन आणि गैरकारभाराचा ठपका
सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी संस्थेच्या कारभारात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळून आल्या. नियम पायदळी तुडवून, कायद्याला केराची टोपली दाखवत संस्थेचा कारभार सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही कठोर कारवाई करण्यात आली.
सहकारात भोंगळ, शिक्षणातही तसाच कारभार?
सहकार क्षेत्रात गैरप्रकार करणारे लोक शिक्षण संस्थेतही तितकेच सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप प्राध्यापकांकडून करण्यात आला आहे.
विद्यार्थी, पालक आणि इतर शिक्षकांचे आर्थिक व मानसिक नुकसान करून नाहक त्रास देण्याचा पद्धतशीर कट रचला जात असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.
प्रश्न एकच – अशा लोकांना शिक्षण संस्थेत कोणाचं अभय?
सहकार संस्थेत अपात्र ठरलेले लोक शिक्षण संस्थांमध्ये पदांवर कसे टिकून राहतात?
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या प्रवृत्तीवर प्रशासन आणखी कडक कारवाई करणार का?
की पुन्हा एकदा हे प्रकरण फाईलमध्ये गाडले जाणार?
सांगोल्यात या कारवाईमुळे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहो जरा थांबता का? ज्ञानमंदिर की हाणामारीचा अड्डा? विद्यार्थी झाले आता शिक्षकांनी एकमेकांना धुss धुss धुतलेsss?
