Dr. Ganpatrav Dekhmukh College Sangola
बस्स करा रेरेरेरे! किती फसवणार? किती लुटणार? न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज व डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात झणझणीत आरोप?
विशेष प्रतिनिधी : माजी मंत्र्यांच्या शैक्षणिक संस्थेत त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा आणि दिलेल्या वचनांचा नुसता चुराडा सुरू असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या संस्थेतील कारभारामुळे शिक्षकच असुरक्षित असल्याची गंभीर चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेतील आडमुठ्या सचिवाच्या मनमानी कारभारामुळे शिक्षकांवर मानसिक, आर्थिक दबाव टाकला जात असल्याचे आरोप होत आहेत. शिक्षकांना धमक्या देणे, , तसेच “खरं बोलाल आणि न्या यासाठी लढला तर पोलीस स्टेशनची पायरी चढवू” असा धाक दाखवला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
संस्थेमध्ये सध्या प्रचंड गदारोळाचे वातावरण असून, आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शिक्षकांना जाणीवपूर्वक दाबण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आहे.
शिक्षकांनी सांगितले की, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून खोट्या तक्रारी उभ्या करून दबाव टाकला जातो आणि चुकीच्या गोष्टी मान्य करण्यास त्यांच्याकडून सह्या करण्यास त्यांना भाग पाडले जात आहे.
“आमचे विद्यार्थी आम्ही शिकण्यासाठी, घडण्यासाठी पाठवतो; तर तुमचे राजकारण करण्यासाठी नव्हे,” अशी स्पष्ट भूमिका अनेक पालकांनी मांडली.
पालकांचा आरोप आहे की, हे ज्ञानमंदिर स्वार्थासाठी नव्हे तर मूल्यांसाठी उभारले गेले होते. “स्वर्गीय आबासाहेबांनी उभं केलेलं हे ज्ञानमंदिर राजकारण करण्यासाठी नव्हे. इथे फक्त सत्य, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार व्हायला हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली. तसेच, संस्थेतील सचिवाला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणीही पालकांकडून जोर धरत आहे.
अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांना आर्त हाक :
दरम्यान, शिक्षक संघटनांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, सुरक्षितता, सन्मान आणि न्याय या मूलभूत बाबींचा अभाव असेल तर शिक्षणाची गुणवत्ता टिकू शकत नाही. “आम्हाला केवळ आमचं काम शांतपणे करायचं आहे. न्याय मिळालाच पाहिजे,” अशी आर्त हाक शिक्षकांकडून अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांना देण्यात येत आहे.
अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांनी दोषींवर कारवाईची मागणी :
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न गंभीर बनले आहेत. अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांनी तातडीने पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
