
Maharashtra Government
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून गुंठेवारीची खरेदी-विक्री थांबलेली होती.(Government) विशेषतः एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठ्यांचे छोटे तुकडे खरेदी करण्यास सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत होत्या. मात्र, आता ही अडचण दूर होणार आहे. राज्य शासनाने (Government) अशा लहान तुकड्यांच्या खरेदी-विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून प्रांतधिकाऱ्यांकडून ते नियमित करता येणार आहे.
Government : २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, १९६५ ते २०१७ या कालावधीत झालेले अशा प्रकारचे तुकडे नियमित करण्यासाठी बाजार मूल्यातील २५ टक्के शुल्क शासनाकडे जमा करणे बंधनकारक होते. ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांसाठी फार मोठी ठरत असल्याने या व्यवहारांना पूर्णपणे खीळ बसली होती. परिणामी, अनेक व्यवहार रखडलेले होते आणि सामान्य लोकांना घर, विहीर, रस्ता यासाठी लहान भूखंड घेणे अशक्य झाले होते.
Manisha Rani : मनिषा रानीच्या फोटोंचा धुमाकूळ;चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया ‘मानसूनमध्ये उकाडा’ की काय?
सांगोला विधानसभा मतदारसंघातसुद्धा (Government) अशा लहान गुंठेवारी व्यवहारांचे प्रमाण मोठे आहे. येथील अनेक कुटुंबांना फक्त एक-दोन गुंठे जागा घ्यायची होती पण ते नियमांच्या अडचणींमुळे शक्य होत नव्हते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी घेतली. त्यांनी या संदर्भात राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी निवेदने दिली.
या मागणीला अखेर यश मिळाले आहे. महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळात जाहीर केले की आता एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठ्यांचे तुकडे खरेदी-विक्रीसाठी नियमीत करता येणार आहेत. या व्यवहारांवर खरेदी दस्ताच्या ५ टक्के शुल्क शासनाला भरावे लागेल. हे शुल्क भरल्यानंतर अशा भूखंडावर विहीर, घर, रस्ता अशा बांधकामांना अधिकृत परवानगी मिळू शकणार आहे.
या निर्णयामुळे सांगोला मतदारसंघासह राज्यातील असंख्य सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून लहान भूखंडांवरील व्यवहारांना पुन्हा गती येणार आहे.
रोजगाराची सुवर्णसंधी! 🌟🌟🌟
🖋️ ✅ ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी/ ऑफिस कामासाठी
महिला/पुरुष पाहिजेत (Office Work)जागा : ४
शिक्षण : Typing , MSCIT , पदवीधर
पगार : अनुभवानुसारमहत्त्वाचे :
✔️ वयाची अट नाही
✔️ स्थानिक / परगावी राहणारे
✔️ परगावी राहणाऱ्यांना एस टी पास सुविधा📞 संपर्क :
📱 8605759261, 9730576560🏢 पत्ता:
बनकर कॉम्प्लेक्स,
जुना बायपास रोड,रेल्वे स्टेशन जवळ, सांगोला