
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला,(FabTech College ) महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर (एम. एस.) शिक्षण अमेरिका व कॅनडा येथे घेऊन शासकीय सेवेत व नामांकित कंपनीत कार्यरत राहून फॅबटेक काॅलेजच्या (FabTech College ) शैक्षणिक गुणवत्तेचा डंका परदेशात केला असल्याची माहिती फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमित रूपनर यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज मधील सिव्हिल इंजिनिअरिंग (FabTech College ) विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर (एम. एस.) शिक्षण अमेरिका व कॅनडा मध्ये घेऊन संगेवाडी (ता. सांगोला) येथील प्रणव गोरख खंडागळे हे कॅनडा ट्रान्सपोर्टेशन विभागात कार्यरत आहेत. तसेच सांगोला येथील सौरभ आण्णासो ढोण हे टेक्सास ए ॲण्ड एम युनिव्हर्सिटी किंग्सविल मध्ये पदव्युत्तर (एम. एस.) शिक्षण पुर्ण करून अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत आणि यलमार मंगेवाडी (ता. सांगोला) येथील विष्णू आप्पासो चौरमुले यांनी लामार युनिव्हर्सिटी, वाॅशिंग्टन येथे पदव्युत्तर (एम. एस.) शिक्षण घेऊन अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. (FabTech College)
हे तिन्ही विद्यार्थी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थी आहेत. फॅबटेक काॅलेज मध्ये अभियांञिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (एम. एस) शिक्षणासाठी परदेशातील युनिव्हर्सिटीत शिक्षणाची संधी भेटत असल्याने पालक वर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
फॅबटेक काॅलेज मधील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊन शासकीय सेवेत तसेच नामांकित कंपनीत नोकरी मिळत असल्याने त्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.