पूर्णेत प्रभारी सिईओ म्हणून वंचितच्या कार्यकर्त्यांनी गाढवालाच बांधले निवेदन

परभणी/ आनंद ढोणे पाटील : जिल्ह्यातील पूर्णा शहर नगरपरिषद प्रशासना विरुद्ध ता.४ जून बुधवार रोजी दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकोपयोगी विविध मागण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.शहरातील मुख्य रस्त्यावरुन महिला व पुरुषांनी सदर मोर्चा काढण्यात आल्यानंतर तो नगरपरिषद कार्यालया समोरील प्रवेशद्वारावर धडकला.
नगरपालीका प्रशासन अधिका-यांच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारा विरोधात प्रचंड घोषणा दिल्या.तद्नंतर,मोर्चाचे विसर्जन झाल्यावर त्याचे जन आक्रोश सभेत रुपांतर झाले.ह्या वेळी मा.नगराध्यक्ष दिलीप हणमंते,वंचितचे सुनील मगरे,तुषार गायकवाड,राजू नारायणकर, विधीज्ञ अविनाश भोसीकर यासह आदी मान्यवरांनी नागरीसुविधा पुरवत नसलेल्या पालीका प्रशासना विरुद्ध खरपूस समाचार घेतला.शेवटी बराचवेळ चाललेल्या मार्गदर्शनपर भाषणानंतर नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी डॉ उत्कृष्ट गुट्टे,ओ एस मुंमतजीत व अन्य अधिकारी गैरहजर होते.अखेर कार्यकर्त्यांनी प्रभारी सिईओ म्हणून आणि हेच मुख्याधिकारी समजून चक्क एका मोकार गाढवालाच हार अर्पण करुन निवेदन बांधले. यावेळी एकच हसा पिकला.
महाराष्ट्र शासन नगरविकास मंत्रालयाच्या वतीने एक शासन निर्णय अध्यादेश निर्गमीत करुन नवीन मालमत्ता करवाढ करण्यात आली आहे.सदरील करवाढ रद्द करण्यात यावी यासाठी मागील काही दिवसापासून शहरातील नागरीक निवेदन देत आहेत.मोर्चे काढत आहेत.त्याच बरोबर निर्माण झालेल्या नागरी समस्या, शहरातील स्वच्छता,रस्ते बांधणी, सभागृह दुरुस्ती, पुतळा उभारणी, सुशोभीकरण अशा स्वरुपाच्या मागण्या करु लागलेत.परंतू,त्या मागण्या न सोडवता पालीका प्रशासन त्या मागण्या निवेदनास केराची टोपली दाखवत आहे.
शिवाय, शहरातील रस्ते,नाल्या बांधणीकरीता विविध योजनेतून आलेला निधीचा योग्य विनियोग न करता सबंधीत गुत्तेदार, अभियंता,न.प.अधिकारी हे संगनमताने थातूरमातूर आणि बोगस पध्दतीचे कामे करुन भ्रष्टाचार करु लागल्यामुळे त्या सबंधी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अमरण उपोषणे केली.तरीशुध्दा मागणी केलेल्या कामाची साधी तपासणी चौकशीही होत नाही.त्यामुळे शहरवासीय पालीका प्रशासनाला वैतागून गेलेत. त्यातूनच संतप्त झालेले नागरीक नेहमीच नगरपरिषदेच्या मनमानी काराभारा विरुद्ध आंदोलने करु लागलीत.असे असताना मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या पालीका प्रशासनाला जाग येत नाही.असी ओरड पूर्णेकरातून केली जात आहे.