आरोग्यकृषीदेश- विदेश
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला एस.टी. आगारात वृक्षारोपण; ९० झाडांची लागवड करून हरित संदेश

सांगोला : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला एस.टी. आगारात वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणाचे जतन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देत आगार परिसरात तब्बल 90 झाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक विकास पोपळे, वन अधिकारी कोंडे, इंगवले मॅडम, कार्यशाळा अधीक्षक पारसे, वाहतूक निरीक्षक कदम, तसेच चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वांच्या सहकार्याने पार पडलेला हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक नव्हे तर समाजाला सकारात्मक संदेश देणारा ठरला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करत एस.टी. विभागाने सामाजिक भान जपले असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.