बॅकलेस वनपीसमध्ये समुद्रकिनारी दिलखेचक अदा अन सिझलिंग पोझेसने..!

एंटरटेनमेंट ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस डीवा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या फोटोशूटमुळे ही अभिनेत्री पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बॅकलेस पिंक ड्रेसमध्ये तिच्या दिलखेचक अदा आणि सिझलिंग पोझेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ही अभिनेत्री म्हणजे सोफी चौधरी (Sophie Choudry) ज्यांनी त्यांच्या हॉट आणि ग्लॅमरस लुकमुळे अनेकदा सोशल मीडियावर आग लावली आहे. यावेळी त्यांनी थायलंडच्या प्रसिद्ध खाओ लाख बीचवर केलेल्या फोटोशूटमधील काही खास छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.

या फोटोंमध्ये सोफीने बॅकलेस पिंक ड्रेस परिधान केला असून, ती समुद्रकिनारी चालताना विविध सिझलिंग पोझ देताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये कोणताही फिल्टर वापरलेला नाही, ती नैसर्गिक सूर्यास्ताच्या प्रकाशात पोझ देताना दिसते.

तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे –
“डुबत्या सूर्याबरोबर हॉटनेसचं रूप दाखवत आहे.”
हे विधान तिच्या लुक आणि अटिट्यूडला पूर्णपणे शोभेल असंच वाटतं.
सोफीच्या या नव्या लुकने तिचे चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले असून, इंटरनेटवर तिच्या फोटोंचा जोरदार व्हायरल ट्रेंड सुरू आहे.
