देश- विदेशमहाराष्ट्र

२० वर्षांनंतरही हुंड्याचा छळ! सोलापूरात विवाहितेला विष देण्याचा प्रयत्न, बेदम मारहाण


सोलापूर / प्रतिनिधी: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर राज्यात महिलांवरील घरगुती हिंसाचाराची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, महिलेला मारहाण करून जबरदस्तीने विष पाजण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा विवाह 2007 साली सोलापुर येथील पुरुषाशी झाला होता. त्यानंतर दीर्घकाळापासून त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप आहे. 2014 मध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांनी सासरच्या मंडळींनी लेखी हमी देत त्यांना पुन्हा नांदवले.

14 मे रोजी महिले वर दीर, जाऊ यांनी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा फाटला असून, अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. याशिवाय त्यांना विष पिण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगितले जात आहे.

विवाहितेला घरात कोंडून ठेवले

मारहाणीनंतर महिलेला दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांच्या मुलाने आल्यानंतर त्यांना सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात महिलेचा नवरा, दीर,जाऊ, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अद्याप मोकाट

महिलेचा नातेवाईकांनी पोलिसांवर आरोपींना अटक न केल्याचा आरोप करत तात्काळ अटकेची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. “लग्नाच्या वीस वर्षांनंतरही जर मुलीला अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य कुटुंब काय करणार?” असा सवाल पीडितेच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button