फँड्री जोडी पुन्हा चर्चेत; जब्या म्हणतोय शालूला, “एक नंबर, तुझी कंबर”

विशेष प्रतिनिधी: ‘फँड्री’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत आहे तिच्या एका हटके व्हिडीओमुळे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत ती संजू राठोडच्या ‘एक नंबर, तुझी कंबर…’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
राजेश्वरीने लाल साडीतील पारंपरिक वेशभूषा परिधान केली असून व्हॅनिटी व्हॅनमध्ये ती गाण्याच्या ठेक्यावर नाचताना दिसते. तिच्या या उत्स्फूर्त डान्सला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही तासांतच हजारो व्ह्यूज मिळाले असून, कमेंट्समध्ये चाहते तिच्या अदा, आत्मविश्वास आणि अभिनय कौशल्याचं कौतुक करत आहेत.
राजेश्वरी खरात ही ‘फँड्री’मधील शालू या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. सिनेमा प्रदर्शित होऊन दशकभराचा काळ उलटला असला तरी राजेश्वरी अजूनही विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती.
आता तिचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा तिला सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये घेऊन आला आहे. चाहते म्हणतात, “शालू अजूनही तितकीच सुंदर आणि आत्मविश्वासू दिसतेय.”
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983