देश- विदेशमहाराष्ट्र

Big Breaking : फरार सासरा,दीरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची कठोर पावले


पुणे/प्रतिनिधी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. सात दिवसांपासून फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पहाटे स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांना लवकरच न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया: पोलिसांनी योग्य पावले उचलली

मुख्यमंत्री यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हगवणे प्रकरणात पोलिस योग्य आणि वेळेवर कारवाई करत आहेत. या घटनेतील दोषींना शिक्षा होणारच.” तसेच, राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका स्पष्ट – “माझा कुठलाही संबंध नाही”

प्रकरणावरून सोशल मीडियावर निशाणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं की, “या घटनेशी माझा कुठलाही थेट संबंध नाही. कोणतीही चुकीची गोष्ट मी सहन करणार नाही. दोषींवर कठोर कारवाईच होणार.” अजित पवार आज तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैष्णवीच्या कुटुंबीयांची मागणी : मकोका लावा, कठोर शिक्षा द्या

वैष्णवीच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा जोरदार मागणी करत सर्व आरोपींवर मकोका (MCOCA) लावावा आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. “आमच्या मुलीला न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे,” असे भावनिक वक्तव्य तिच्या वडिलांनी केलं.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला In Public News; आवाज सर्वसामान्यांचा फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button