मनोरंजन

‘याचं बेडरूम सिक्रेट’ चर्चेत! लग्न झालंय पण राहतात वेगळ्या रूममध्ये!


मुंबई/प्रतिनिधी : टीव्ही इंडस्ट्रीमधील नाती जशी ग्लॅमरस असतात, तशीच काही वेळा गुंतागुंतीचीही असतात. अनेकदा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चर्चेत येतात. सध्या छोट्या पडद्यावर ‘नागिन’ म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी ज्योती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

सुरभीने अलीकडेच अभिनेता सुमित सूरीसोबत विवाह केला. मात्र लग्नानंतर ती स्वतःच्या नवऱ्यापासून एका वेगळ्या खोलीत राहत असल्याचं तिने स्वतः उघड केलं आहे. हे दोघं एकाच घरात राहत असले तरी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहणं पसंत करतात.

एका मुलाखतीत सुरभी म्हणाली, “माझं खासगी जागेवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघंही अनेकदा घरातूनच काम करतो. शूटिंग नसताना मी संपूर्ण वेळ घरातच असते. आम्हाला बाहेर फिरायला जाण्यापेक्षा घरात वेळ घालवणं जास्त आवडतं.”

ती पुढे म्हणाली, “त्यालाही एकटं राहणं आवडतं आणि मलाही. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या संमतीने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायचं ठरवलं. यात आमचं नातं कुठेच बिघडलेलं नाही, उलट आम्ही दोघंही एकमेकांचा सन्मान करतो.”

सुरभीच्या या वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला, तरी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुकही केलं जात आहे. या निर्णयामागे दोघांचं परस्पर समजूतदारपणा आणि आधुनिक नात्यांचा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button