terrorist attack Pahalgam
Terrorist attack in Pahalgam : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचा कट एक वर्षापूर्वीच रचला गेला होता. बिजनेस सिस्टम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (बीएसआय) या पाकिस्तानी कंपनीने अमेरिकेची उपग्रह कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजीकडून पहलगाम भागातील उच्च-रिझोल्यूशन उपग्रहीय छायाचित्रे खरेदी केली होती. ज्यामुळे हल्ल्याच्या कटात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा संशय आहे.
अहवालात बीएसआयचा मालक ओबेदुल्लाह सईद याचे पाकिस्तानच्या ऊर्जा आयोगाच्या (पीएईसी) अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांचाही खुलासा झाला आहे.
याव्यतिरिक्त, वॉशिंग्टन पोस्टच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सहा हवाई क्षेत्रांवर भारतीय हल्ल्यांची पुष्टी झाली आहे. त्याचबरोबर, तुर्कीच्या पाकिस्तानला पाठिंबा दर्शविल्यामुळे भारतात तुर्कीविरुद्ध बहिष्कार मोहीमही तीव्र झाली आहे.
