फॅबटेक पॉलिटेक्निकचे घवघवीत यश; सिव्हिल विभागातील ११ विद्यार्थ्यांची कोलब्रो कंपनीत निवड

सांगोला/ प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात तंत्र शिक्षणात आघाडीवर असलेल्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या ११ विद्यार्थ्यांची ‘कोलब्रो’ या नामवंत कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.धनंजय शिवपूजे यांनी सांगितले.या उल्लेखनीय यशामुळे संस्थेने प्लेसमेंट क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
या निवड प्रक्रियेसाठी महाविद्यालयातच प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी इंग्लिश वरील प्रभुत्व ,तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखती अशा विविध टप्प्यांत उत्कृष्ट कामगिरी केल्याने यश बिराजदार, असंग लोकरे,प्रशांत लोहार ,ओम कोळवले,जयदीप गायकवाड,गणेश बुरले,पवन अनूसे,यशराजे बुरले,आकाश आलदर,अजय सुरवसे आणि सोहम फराटे यांची निवड करण्यात आली.
फॅबटेक पॉलिटेक्निकचे हे यश संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीचा आणि उद्योग जगतातील दृढ संबंधांचा पुरावा आहे. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत असून तांत्रिक शिक्षण क्षेत्रात फॅबटेकचा ठसा अधिक गडद होत असल्याचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले, यांनी सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सिव्हिल विभागप्रमुख प्रा. शाम कोळेकर आणि प्रा. शितल जगदाळे (प्लेसमेंट समन्वयक) यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा, श्रीमती निलवर्णा रुपनर, उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब रुपनर ,संस्थेचे सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.