सांगोला
दि आर्ट ऑफ लिविंग परिवार सांगोला व तहसील कार्यालय सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने दि आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सांगोला / प्रतिनिधी: दि आर्ट ऑफ लिविंग परिवार सांगोला आणि तहसील कार्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, दिनांक १३ मे २०२५ रोजी सांगोला येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात, सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
राष्ट्रसेवा व समाजसेवेची जाणीव वाढावी, तसेच रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे शिबिर घेतले जात आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्याचा संधी नागरिकांनी निश्चितच घ्यावी, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
संपर्क
9987457212, 9405412121