सांगोला

लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंदची सोनाली काशीद आय.टी. विषयात बोर्डात सर्वप्रथम


 सांगोला / प्रतिनिधी :  फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर  ज्युनिअर कॉलेजमधील सोनाली सिद्धेश्वर काशीद हिने शास्त्र शाखेत आय.टी. म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून पुणे बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवीला आहे.

लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण असून, यापुढेही हे कॉलेज फक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देऊन नवीन विक्रम  प्रस्थापित करेल. असा विश्वास संस्था अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत कॉलेजने 100% निकालाची परंपरा अबाधित ठेवली. आय. टी विषयात 98 पेक्षा जास्त गुण  7 विदयार्थ्यानी मिळविले आहेत.  90 पेक्षा जास्त गुण 45 विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. तसेच मराठी व भूगोल विषयात 90 पेक्षा जास्त गुण  दोन विद्यार्थ्यानी मिळविले  आहेत.

शास्त्र शाखा व 10वी करिता वर्षभर  साप्ताहिक टेस्ट सिरीज राबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी सतत अभ्यासात राहतो. शालेय परिसरात 100% मोबाईल वापरू दिला जात नाही. प्रत्येक टेस्टचे मार्क पालकांच्या मोबाईल वर पाठविले जातात.

अप्रगत विद्यार्थ्यांच्या पालकांना कॉलेजमध्ये बोलावून  समज दिली जाते. एकंदरीत विद्यार्थी सतत अभ्यासात कसा राहील हेच पाहिले जाते. यावर्षी पासून प्रोजेक्टरद्वारे अध्यापन सुरु केले असून, नीट, जे. ई. ई. व साईटी साठी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे.

संस्था अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले, सचिव मा. आनंदराव भोसले यांनी शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सोनंद व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी या सोईसुविधांचा लाभ घ्यावा.असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button