Operation Sindoor
विशेष प्रतिनिधी : १८ वर्षांपूर्वीची ती ब्लॉकबस्टर फिल्म, नव्या अभिनेत्रीने माजवली खळबळ, बॉक्स ऑफिसवर मोडले सारे विक्रम!”
बॉलिवूडमधील आयकॉनिक डायलॉगपैकी एक “एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो…” तुम्ही नक्कीच ऐकला असेल. पण तुम्हाला माहित आहे का, हा डायलॉग कुठल्या चित्रपटातला आहे, तो कोणावर चित्रित केला गेला होता आणि ती अभिनेत्री कोण होती?
ही गोष्ट आहे 2007 साली आलेल्या सुपरहिट चित्रपटाची – ‘ओम शांती ओम’. या चित्रपटात दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटात तिने धमाल उडवून दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. त्यातील गाणी आणि डायलॉग्स आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली. विशेषतः ‘दीवानगी दीवानगी’ या गाण्यात तब्बल दोन डझनहून अधिक बॉलिवूड कलाकार झळकले होते. या चित्रपटाचा एक अत्यंत प्रसिद्ध डायलॉग
“एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू” आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
