देश- विदेश

कुछ तो बड़ा होगा! देशभरात उद्या २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल; पाकिस्तानाला भरली धडकी  


दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. या हल्ल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून एक निर्बंध लावले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे आणि अशा चर्चा सुरू आहेत की काहीतरी मोठं घडण्याच्या तयारीत भारत आहे.

देशभरात मॉक ड्रिल

लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवारी (७ मे) मॉक ड्रिल करण्यात येणार  आहे. याआधी १९७१ मध्ये अशाप्रकारची मॉक ड्रिल झाली होती. या मॉक ड्रिलदरम्यान निवडक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्यात येणार आहे. घरं, कार्यालयं, सार्वजनिक ठिकाणांची सर्व लाईट्स बंद ठेवण्यात येतील. मोठ्या आवाजात सायरनही वाजवले जातील. या दरम्यान नागरिकांना सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण दिलं जाईल.

NSA अजित डोभाल आणि पंतप्रधान मोदी यांची खास बैठक

मॉक ड्रिलच्या तयारीदरम्यान दिल्लीमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी एकांतात भेट घेतली. ही बैठक सुमारे ४० मिनिटं चालली.

भारताच्या तयारीमुळे पाकिस्तानाला भरली धडकी  

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानातही अस्वस्थता वाढली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी आधीच चिंता व्यक्त केली होती की भारत त्यांच्या देशावर हल्ला करू शकतो. त्यांनी इशारा दिला की भारत LoC जवळ कोणत्याही क्षणी सैन्य कारवाई करू शकतो.

देशभरात मॉक ड्रिलसाठी तयारी सुरू

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने सोमवारी पाण्याखालील नौसैनिक बंकरचं यशस्वी परीक्षण केलं आहे. हे बंकर युद्धनौकांपासून संरक्षणासाठी वापरले जातात.

दिल्ली, लखनऊ, श्रीनगर, भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर या शहरांमध्ये मॉक ड्रिलसाठी विशेष तयारी सुरू आहे. गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीत, नागरिकांना कसे प्रशिक्षित करावे,एअर रेड सायरन व ब्लॅकआउट प्रसंगी काय उपाययोजना कराव्यात, यावर चर्चा झाली.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button