सोलापूर / प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा प्रशासन व प्रकल्प संचालक सोलापूर कार्यालयाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत, जिल्ह्यातील स्थानिक संस्थांच्या विशेषता शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, उत्पादक गट माध्यमातून एकूण 5 पथदर्शी कृषी पर्यटन केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहे.
हे प्रस्तावित कृषी पर्यटन केंद्रे पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी आणि करमाळा या ४ प्रमुख मंदिरांच्या परिसरात प्रत्येकी एक केंद्र, तसेच उजनी धरणाच्या जलाशयालगत च्या गावात एक केंद्र उभारणे अभिप्रेत आहे. ही केंद्रे संबंधित मंदिराच्या सुमारे 10 कि.मी. त्रिज्येतील मुख्य रस्त्यालगत किंवा जवळच्या ठिकाणी असावीत. उजनीच्या बाबतीत जलाशयालगतच्या गावांमध्ये स्थळ असावे.
सी.एल.एफ., सी.एम.आर.सी. यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांवर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीमार्फत ठरवलेल्या निकषानुसार निवड केली जाईल.
अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती :- अर्ज व इतर अनुषांगिक माहिती प्रकल्प संचालक, कार्यालय नवीन आरटीओ ऑफिसच्या मागे, विजापूर रोड, सोलापूर येथे उपलब्ध असणार आहे. अर्जाचे शुल्क 100 रूपये असून अर्ज वाटपाचा कालावधी दिेनांक 5 मे 2025 ते 15 मे 2025 असेल. विहित नमुन्यास परिपूर्ण अर्ज प्रकल्प संचालक, कार्यालयात सादर करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल, विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी माहिती प्रकल्प संचालक, सोलापूर यांनी दिली आहे.
