HSC Result 2025 Maharashtra LIVE : बारावीचा निकाल 5 मे दु. १ वाजता जाहीर; काही विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला तर काहीची वाढली धाकधूक!

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) पुणे यांच्यातर्फे बारावी (HSC) परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि गुणपत्रिका ऑनलाइन पोर्टलवर रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून पाहता व डाऊनलोड करता येणार आहे.
निकालासोबतच मंडळातर्फे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, एकूण यशाचे प्रमाण, आणि टॉपर्सची यादी यांसारखी महत्त्वाची माहितीही प्रसिद्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्र HSC निकाल 2025 पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे :
विद्यार्थी खालील वेबसाइट्सवरून आपली गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात:
mahahsscboard.in https://mahahsscboard.in
hscresult.mkcl.org https://hscresult.mkcl.org
mahresult.nic.in https://mahresult.nic.in
निकाल ऑनलाइन असा पाहावा?
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: [hscresult.mkcl.org](https://hscresult.mkcl.org) किंवा [mahahsscboard.in](https://mahahsscboard.in)
2. मुख्यपृष्ठावर “HSC Result 2025” किंवा “बारावीचा निकाल” या लिंकवर क्लिक करा
3. रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा
4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
5. गुणपत्रिका PDF स्वरूपात डाऊनलोड करा