सांगोला महाविद्यालयात “महात्मा बसवेश्वर महाराज” यांची जयंती साजरी

सांगोला/प्रतिनिधी :सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, सांगोला महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या प्रतिमेस दि. 30 एप्रिल 2025 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
समाजातील प्रत्येकाने सदाचाराने आचरण करावे, निती-नियमांचे पालन करावे, अनाचार करू नये, चोरी, राग, मत्सर यांचा त्याग करावा, इतरांचा तिरस्कार करू नये, दुस-यांची निंदा करू नये, समानतेने आचरण करा असा महान संदेश व शिकवण महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिल्याचे सांगून,
ते महान व्यक्तीमत्व होते, असे मत महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अमोल पवार व श्री. बाबासो इंगोले यांनी केले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.